![]() |
Income tax return file 2025 |
तुमची जर ITR - Income Tax Return भरत असाल तर तुमच्या साठी काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी देत आहे .
Income Tax Return ( ITR ) कोणी भरायला हवा असा प्रश्न अनेकांना पडतो तर प्रथम आपण पाहुयात ITR कोणी भरणे गरजेचे आहे
जर तुमचे वय ६० वर्ष किंवा त्याच्या आत असेल आणि तुमचा इन्कम २. ५ लाख पेक्षा जास्त असेल तर तुम्हला ITR भरणे बंधनकारक असते . तसेच तुमचे वय ६० ते ८० वर्षांपर्यत असेल आणि तुमचा इन्कम ३लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ITR भरणे आवश्यक आहे. ८० वर्षावरील इन्कमची मर्यादा ही ५लाखांपर्यत आहे .
जर तुमचे उत्पन्न वरील दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असेल तरीही काही गोष्टींमध्ये तुम्हाला ITR हा भरावा लागतो .
जर तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या बिलामध्ये तुमचा TDS (Tax Deducted at Source) कट झाला असेल आणि तुम्हला तो परत घ्यायचा असेल तर तुम्हला रिटर्न फाईल करावी लागते .
तुम्हाला इन्कम फ्रूफ साठी साठी ITR चा उपयोग होतो जर तुमच्याकडे सॅलरी सर्टिफिकेट नसेल तर.
जर तुमच्या Savings Account मध्ये, ₹50 लाख पेक्षा जास्त कॅश डिपॉझिट असेल तसेच तुम्ही ₹2 लाखांपेक्षा पेक्षा जास्त खर्च परदेश प्रवासासाठी करत असाल किंवा ₹1 लाख पेक्षा जास्त खर्च वीज बिलासाठी करत असाल तर तुम्हला ITR करावा लागतो .
Melanie Perkins: १९व्या वर्षी सुरु केलेला Canva जगभरात कसा यशस्वी झाला?
मोबाईल व्यसन – आजची मोठी समस्या! तुमच्या मुलांसाठी धोका?
ITR -१ & ITR -२ फॉर्म कोणासाठी आहे
ज्याचे वार्षिक उत्त्पन्न पगार ,पेंशन,घरभाडे ,बँकांमधील व्याज, एफ डी अशा प्रकारच्या स्त्रोतांमधून ५० लाखांपर्यत असेल तर त्या व्यक्तीने ITR १ भरावा.
ITR-3 फॉर्म कोणासाठी आहे
ITR ३ हा व्यावसाय , प्रोफेशनल उत्पन्न मिळवणारे - सीए , वकील ,एजंट,डॉक्टर ,इंजिनिअर, आर्किटेक्ट,तसेच पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर म्हणून मिळणारे उत्पन्न Salary, Bonus, Commission, Interest इ. असे इंकम असणाऱ्या सर्व व्यक्तींनी ITR ३ भरावा.
याशिवाय खालील उत्पन्न देखील यात दाखवता येते:
![]() |
income tax |
घरमालमत्ता उत्पन्न (House Property Income – एकापेक्षा जास्त घर असल्यास)
भांडवली नफा (Capital Gains – शेअर्स, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी विक्री इ.)
इतर स्रोत (Other Income – व्याज, लॉटरी, इ.)
ITR-3 हा मोठा फॉर्म आहे कारण त्यात अनेक प्रकारचे उत्पन्न दाखवता येतात. महत्त्वाचे विभाग असे:
Part A – General Information (वैयक्तिक माहिती, पत्ता, PAN, आधार)
Schedule S – पगाराचे तपशील
Schedule HP – घरमालमत्तेचे उत्पन्न
Schedule BP – Business/Profession Income
Schedule CG – Capital Gains
Schedule OS – Other Sources
Schedule SI – Special Income (उदा. लॉटरी, रेस हॉर्सेस)
Schedule CYLA/BFLA – Loss Adjustment
Schedule VIA – Deductions (80C, 80D, 80G, इ.)
Schedule AL – Asset & Liability (जर उत्पन्न > ₹50 लाख असेल तर)
ITR-3 कोणत्या परिस्थितीत भरावा लागतो? (उदाहरणांसह)
व्यवसाय करणारा व्यापारी
राजेश याचा टर्नओव्हर ₹1.2 कोटी आहे (आणि Presumptive Scheme वापरत नाही).त्याने ITR-3 भरावा लागेल.
फ्रीलान्सर / प्रोफेशनल
अजय हा सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, Freelancing मधून ₹15 लाख कमावतो. त्याने ITR-3 भरावा लागेल.
CA/Doctor/Lawyer
सीमा ही डॉक्टर आहे. तिच्या क्लिनिकचे वार्षिक उत्पन्न ₹20 लाख आहे.तिने ITR-3 भरावा लागेल.
विनोद हा एका पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर आहे आणि त्याला Commission + Bonus मिळतो.
त्याने ITR-3 भरावा लागेल.
ITR-3 साठी आवश्यक कागदपत्रे
-
PAN कार्डआधार कार्डबँक पासबुक / बँक स्टेटमेंटForm 16 (जर पगार असेल तर)व्यवसायाचे Books of Accounts (Balance Sheet, P&L Account)गुंतवणुकीचे पुरावे (80C, 80D, 80G deductions)Capital Gains ची माहिती (शेअर्स/म्युच्युअल फंड/प्रॉपर्टी विक्री)
ITR Type
हे सुद्धा महत्वाचे आहे - UPI चा मोठा बदल! नवीन नियम 1 ऑगस्टपासून लागू – प्रत्येक वापरकर्त्याने वाचावे"
- ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी Rummy नाही, हे ५ मार्ग आहेत योग्य
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा