![]() |
रशियन महिला नीना कुटिना गोकर्णच्या जंगलात गुहेत राहताना |
हि एक सत्य घटना आहे जुलै २०२५ मधील यावर आपल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास बसणार नाही.
हि गोष्ट आहे एका रशियन महिलेची जी कित्येक वर्ष गोकर्ण च्या जगंलात राहत आहेत. तिचा पुर्ण प्रवास वाचा आणि यावर तुम्हचे काय म्हणणे आहे कमेंट मध्ये सांगा
एक रशियन महिला तिचे नाव नीना कुटिना ती एक रशियन नागरिक आहे. सन २०१६ मध्ये काही कामानिमित्ताने ती व्हिसा आणि पासपोर्ट सहित भारतात आली होती. त्यानंतर ती गोव्याला गेली तिथेही ती गुहेत राहिली १०१७ मध्ये तिचा व्हिसा संपला त्यानंतर तेथील पोलिसांनी तिला पुन्हा रशियाला पाठवले. जेव्हा ती पहिल्यादा भारतात आली तेव्हा तीच्या सोबत एक मुलगा आणि दोन मुली होत्या.
दुसऱ्यांदा पुन्हा ती भारतात आली पण यावेळेस ती पासपोर्ट आणि व्हिसा शिवाय आली येताना पहिल्यादा ती नेपाळ ला गेली आणि तेथून ती लपत छपत गोकर्ण ला पोहोचली या वेळेस तिच्या सोबत फक्त तिच्या दोन मुली एकिच वय ४वर्ष आणि दुसरीच वय ६ वर्ष अशा या तिघी गोकर्णच्या जगंलात गेल्या . गोकर्ण च्या जगलाबद्दल जर तुम्हला माहित नसेल तर तुम्ही युट्युब वरती सर्च करू शकता मी तुम्हाला गोकर्णच्या जंगलबद्धल थोडक्यात सांगतो. गोकर्ण च जगलं अतिदाट झाडांनी भरलेले आहे त्या ठिकाणी अनेक हिंसक जंगली प्राणी , आणि देशातील सर्वात खतरनाक विषारी साप या जंगलात आढळतात . त्याचबरोबर नैसर्गिक गुहा आणि धबधबे हि या ठिकाणी पहायला मिळतात.
![]() |
पोलीस गस्तीदरम्यान सापडलेली जंगलातील गुहा |
जेव्हा त्या तिघी गोकर्ण च्या जंगलात पोहोचल्या तेव्हा त्याना रामतीर्थ डोंगरांमध्ये गुहा दिसली आणि त्यानी त्याच ठिकाणी स्वतःचे वास्तव्य सुरु केले. ना एसी ना टीव्ही ना मोबाईल आजच्या युगात या गोष्टींशीवाय राहणे तुम्ही आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही परंतु त्या तिघी कित्येक वर्ष त्याच जंगलात राहत होत्या. त्यांनी त्या गुहेला काही साड्या बांधल्या होत्या आणि गुहेमध्ये काही हिदू देवदेवतांचे फोटो होते. ते जेवण सुद्धा गॅस किंवा स्टोव्ह वरती करत नव्हत्या तर जंगलामध्येच राहायचं आणि तिथलंच काही खायचं असा त्यांचा दिनक्रम होता. सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूसंख्लन झाले तेव्हा या गुहेच्या असपास सुद्धा असा भूसंख्लन चा आढावा घेण्यासाठी तेथील पोलीस गस्त घालत होते तेव्हा त्याच्या निदर्शनास हि गुहा पडली आणि नीना कुटिना या रशियन महिलेचा गूढ समझला.
![]() |
गोकर्णच्या जंगलातील नैसर्गिक गुहा आणि धबधबा |
जेव्हा पोलिसांनी तिच्याशी संवाद साधला तेव्हा तिने सांगितले कि , बाहेरील समाजाला कंटाळून एका शांततेच्या ठिकाणी राहण्यासाठी ती अशी गुहेत राहत होती . तिने सांगितले कि जंगलातील प्राण्याची भीती होती परंतु काही दिवसानंतर ते सगळे आमच्याशी मित्रांसारखे राहु लागले तेथील धबधब्याच्या आवाजाने आणि शांततेमुळे आम्हला येथे रहाण्यास आवडत होते. तिने कोणत्याही चुकीच्या हेतूने हे सर्व केले नव्हते.मनाला शांतता हवी असेल तर असे बाहेरील जगापासून दुर रहावे वाटते पण त्याच्या एवढे डेअरींग आपल्यात आहे का ? आपण असे जंगलात राहु शकतो का ? तुम्हाला काय वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा
![]() |
Tya Tighina pkadlyanantar |
हे सुद्धा महत्वाचे आहे वाचा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा