![]() |
1 August Pasune New UPI Update |
भारतामध्ये नोटबंदी नंतर कॅश मध्ये व्यवहार खुप प्रमाणात कमी झाले यामुळे भ्रष्टाचार कमी झाला की नाही ते माहीत नाही पण लोकांना ऑनलाईन पेमेंट ची चांगलीच सवय झाली. पान टपरी वर तंबाखुच्या पुडी पासुन विमानाच्या तिकिटांपर्यत सर्व पेमेंट यु पी आय मार्फत होतात . परंतु या यु पी आय मुळे अनेक ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुध्दा घडत असतात. त्यामुळे या यु पी आय मध्ये संरक्षणच्या दृष्टीने सतत अपडेट केले जातात . १ ऑगस्ट पासून काही नवीन नियमावली हि यु पी आय मध्ये करण्यात येणार आहे .
जर तुमचा मोबाईल नंबर निष्क्रिय झाला असेल तर तो नंबर यु पी आय मध्ये काम करणे बंद होतो. असे यु पी आय आयडी अटोमॅटिक बंद केली जातात .
एन पी सी आय आणि आर बी आय यांनी आजून हि महत्वाचे निर्णय यु पी आय साठी घेतलेले आहेत .
सर्व यू पी आय ऍप म्हणजेच गुगल पे , फोन पे, भिम ऍप अश्या सर्व अॅप्सना दर आठवड्याला वापरकर्त्यांचे मोबाईल नंबरअपडेट करणे बंधनकारक केले आहेत. यामुळे सिम रिसायकलिंग सारख्या फसवणुकिला आळा बसतो .
जर एखाद्या UPI ID वर 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत कोणतेही व्यवहार झाले नसतील, तर ती UPI ID ऑटोमॅटिक बंद केली जाईल.हि सुविधा बंद करण्यापुर्वी तुम्हला मॅसेज किंवा ईमेल द्वारे सूचना दिली जाते . वापरकर्ता हवे असल्यास ती UPI ID पुन्हा सुरू करू शकतो.
![]() |
New UPI Update |
आता तुम्ही कोणालाही UPI अॅपद्वारे पेमेंट करताना रिसिव्हरचे नाव आधी दिसेल
यामुळे चुकीच्या किंवा फसवणूक करणाऱ्या व्यवहारांपासून संरक्षण होईल.
मुंबई BKC मधील भारतातील पहिलं Tesla Showroom – संपूर्ण माहिती आणि वैशिष्ट्ये
१ ऑगस्ट 2025 पासून नवीन तांत्रिक मर्यादा
UPI app द्वारे आपण या आधी कितीही वेळा आपला बॅलन्स चेक करायचो परंतु १ ऑगस्ट पासून तुम्ही दिवसाला फक्त ५० वेळाच बॅलन्स चेक करू शकता .
अकॉउंट लीक माहिती तुम्ही दिवसाला २५वेळा पाहू शकता
AutoPay व्यवहार फक्त सकाळी १० पूर्वी, दुपारी १–५ दरम्यान, रात्री ९.३० नंतरच करता येतील यामुळे सिस्टीम वरील लोड कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत
Payment status retry ९० सेकंदाच्या अंतराने फक्त ३ वेळा प्रयत्न करता येईल
RBI ने एक नवीन संकेत:दिला आहे UPI व्यवहार आता एकदम फ्री आहे त्याना कोणताही चार्जेस लागत नाहीत परंतु लवकरच छोटे शुल्क लागू होऊ शक्यता आहे
भविष्यात दीर्घकालीन शाश्वतीसाठी काही नाममात्र फी लागू होण्याची शक्यता आहे.
![]() |
G-Pay,Phone Pe |
क्रेडिट कार्ड (RuPay) लिंकिंगचा विस्तार
या आधी आपल्याला क्रेडिट कार्ड चा वापर करून स्कॅनरने दुसऱ्या व्यक्तीला पेमेंट करणे शक्य नव्हते परंतु नवीन अपडेट नुसार वापरकर्ता आता UPI अॅपमधून RuPay क्रेडिट कार्ड लिंक करून पेमेंट करू शकतो.
QR कोड स्कॅन करूनही क्रेडिट कार्ड वापरता येते.
UPI Global (आंतरराष्ट्रीय व्यवहार)
UPI भारतमध्ये सर्वत्र खुप चांगल्या प्रकारे चालते परंतु ते विदेशातही म्हणजेच सिंगापूर, फ्रान्स, भूतान, नेपाळ आणि UAE या देशांमध्येहि UPI पेमेंट आपल्याला करता येते भारतीय QR कोड स्कॅन करून विदेशातही पेमेंट करता येईल.
AI Fraud Detection System चा वापर
UPI म्हणजेच NPCI आणि बँका या AI आधारित व्यवहार ट्रॅकिंग करत आहेत. कोणताही संशयास्पद व्यवहार झाला की ताबडतोब अलर्ट मिळतो.यामुळे तुमच्या सोबत कोणीही फसवणुक करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हला ताबडतोब तो व्यवहार थांबवता येतो
UPI ने पेमेंट करणे जितके सोपे आहे तितकेच धोकादायक सुद्धा आहे त्यामुळे
"सतर्क राहा, सुरक्षित राहा!"
हे सुध्दा वाचु शकता
हनी ट्रॅप म्हणजे काय? फसवणुकीपासून वाचण्यासाठी मार्ग
फेसबुकची कुंडली: मोबाईलमध्ये वेळ घालवणाऱ्या अॅपची खरी कहाणी
![]() |
UPI Fraud |
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा