![]() |
Mobile cha time kami kara |
मोबाईल...
एक दिवस मनात विचार आला — आपली आठवड्याची सुट्टी असते, तेव्हा आपल्या मोबाईललाही एक दिवस सुट्टी द्यावी आणि एक दिवस मोबाईल शिवाय घालवावा.
पण काही केल्या तो दिवस अजूनही आला नाही… आणि मोबाईल शिवाय एकही दिवस गेला नाही.
सध्याच्या परिस्थितीत लहान मुलांमध्ये मोबाईल पाहण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. कित्येक तास ते स्क्रीन सरकत असतात. त्यामध्ये नेमकं काय पाहातात याकडे पालकांचं लक्ष असतंच असं नाही. पण हा प्रश्न असा आहे की ही सवय लागते कशी?
मुलं जन्मतः मोबाईल पाहात नाहीत. ही सवय लागते आपल्यामुळे.
जेव्हा मुलं खाणं टाळतात, रडतात, हट्ट करतात — तेव्हा आपणच त्यांना मोबाईल समोर ठेवतो. “थोडं कार्टून पाहा,” असं सांगतो… आणि हळूहळू मोबाईल हे त्यांचं 'शांत करण्याचं औषध' बनतं. हाच सुरुवातीचा टप्पा असतो व्यसनाचा.
एक अनुभव माझ्या स्वतःच्या मुलांचा ...
माझा मुलगा वय आता ६वर्ष , तो जेव्हा २वर्षाचा होता तेव्हा आमचे एक किराणा शॉप होते मी सकाळी ६ ते १० दुकान चालवायचो नंतर बायको आणि माझा मुलगा दुकानात असायचा . आता दुकानात त्याला कोढल्यासारखे होत होते तेव्हा सुरवात झाली त्याला मोबाईल मध्ये गुतंवून ठेवण्याची संध्याकाळी मी ऑफिस वरून कंटाळून आलो कि पहिला त्याला मोबाईल मध्ये कार्टून लावून द्यायचो जेणेकरून मला अराम मिळेल . पण मी हे विसरून गेलो कि तो दिवसभर दुकानात कोंडून आहे आणि मोबाईल पहात आहे आणि आता रात्री सुद्धा मोबाईल .. त्यानंतर त्याचे मोबाईल पहाण्याचे एवढे वाढले कि तो एक मिनिट सुद्धा मोबाईल शिवाय राहू शकत नव्हता . माझी चूक माझ्या लक्षात आली पण तेव्हड्यात त्याच्या डोळ्याला त्रास र्हायला लागला . डॉक्टरांनी सांगितले कि याचा स्क्रिन टाईम कमी करा अन्यथा डोळे तर खराब होतील पण मानसिक पण त्रास होऊ शकतो.
आम्ही काही दिवसांत पूर्ण प्रयत्न करून त्याची मोबाईलची सवय मोडली पण हे करणं सहजपणे शक्य नव्हते त्याच्यावर न ओरडता न मारता त्याला समाजवणे आणि मोबाईल पासून दूर ठेवणे हे खूप कठीण होते . पण आम्ही ते केले आणि आज एक वर्ष झालं त्याने मोबाईल ला हात सुद्धा लावलेला नाही. मोबाईल ची सवय सोडण्यासाठी मी काय केले .. त्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आमच्या दोघांच्याकडे पण वेळ नव्हता म्हणून तो मोबाईल पाहायचा आता मी ऑफिस वरून आल्यानंतर मोबाईल ड्रॉवर मध्ये ठेवतो आणि त्याला गार्डन ला घेउन जातो मस्त १तास त्याच्या सोबत खेळतो . त्याला सायकल घेउन दिली . तो आता खळतो आणि कार्टून पण पहातो पण टीव्ही ला तेही ठराविक वेळ . मित्रांनो मी एक सांगू इच्छितो कि मुलांना मोबाईल घेयचा नसतो पण आपण त्याला दुसरा ऑपशन देत नाही म्हणून मुलांना मोबाइल घ्यावा लागतो .
अजून वाचा
"मध्यमवर्गीय कुटुंब आणि कर्जाचा विळखा – एक सत्य अनुभव"
ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी Rummy नाही, हे ५ मार्ग आहेत योग्य
मोबाईलच्या अति वापराचे तोटे:
-
👀 डोळ्यांवर ताण
-
🧠 एकाग्रतेचा अभाव
-
😠 चिडचिडेपणा
-
💤 झोपेचा अभाव
-
🧍 स्थूलपणा व शारीरिक दुर्बलता
-
📉 संवाद कौशल्यांचा अभाव
पालकांनी घ्यायची काही सोपी पण प्रभावी पावलं:
-
मोबाईलचा वेळ निश्चित करा (उदा. दररोज फक्त 30-45 मिनिटे)
-
मैदानी खेळ व सामाजिक संवादाला प्रोत्साहन द्या
-
घरात मोबाईल फ्री टाइम ठरवा (उदा. जेवणाचे वेळेस मोबाईल बंद)
-
स्वतः उदाहरण ठेवा – मुले तुम्हाला पाहून शिकतात
-
Parent Control Apps वापरा आणि पाहणारी content तपासा
मोबाईल हे साधन आहे, जीवन नव्हे.
त्याचा योग्य वापर झाला तर तो उपयोगी; पण अतिरेक झाला तर घातक.
तुम्ही पालक म्हणून मोबाईलच्या सवयीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता? खाली कमेंट करून नक्की सांगा.
![]() |
kids time kami kara |
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा