रत्नांविषयी संपूर्ण माहिती – प्रकार, फायदे, ओळख आणि वापर

MAJE_GHAR

रत्नांविषयी संपूर्ण माहिती – प्रकार, फायदे, ओळख आणि वापर

Rashi Nusar Tumhala Konte ratn labhdayk tharu shakte
पन्ना (Emerald)

 

जर तुम्हाला या ब्रह्मांडावर विश्वास असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

प्रत्येक व्यक्तीचा धातू आणि रत्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कुणाला ते अंधश्रद्धा वाटतात, तर कुणी म्हणतात – जर फक्त रत्न घालून यश मिळत असेल तर मग सगळ्यांनीच रत्न घालून कष्ट करणं सोडून दिलं असतं.

परंतु वास्तव वेगळं आहे. अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो, सातत्य ठेवतो, पण अपेक्षित यश मिळत नाही. अशा प्रसंगी रत्नांचा विचार करता येतो. हे रत्न ग्रह-नक्षत्रांच्या ऊर्जेला संतुलित करण्याचे कार्य करतात असे मानले जाते.

या लेखात मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी उपयुक्त असे रत्न कोणते आहेत, त्यांचे फायदे आणि वापराची पद्धत सांगणार आहे. मात्र लक्षात ठेवा – रत्न हे केवळ साधन आहे, खरे यश तुमच्या कष्टांमधून आणि कर्मातूनच मिळते.प्रामाणिक पणे कर्म करत राहावे . 

आज आपण पन्ना या रत्नांची माहिती घेऊयात 🌿 पन्ना म्हणजे काय?

Gemstone baddhl mahiti
Gemstone

ITR म्हणजे काय? प्रकार, Last Date आणि सविस्तर माहिती 2025 

Melanie Perkins: १९व्या वर्षी सुरु केलेला Canva जगभरात कसा यशस्वी झाला?
 
पन्ना (Emerald) हे हिरव्या रंगाचे मौल्यवान रत्न आहे. संस्कृतमध्ये याला मरगज किंवा हरितमणी म्हणतात. हे रत्न प्रामुख्याने बेरिल (Beryl) या खनिजापासून तयार होते. याचा सुंदर गडद हिरवा रंग क्रोमियम व व्हॅनॅडियम या खनिजांमुळे येतो पन्ना हे बुध ग्रहाचे रत्न आहे.कन्या आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना हे रत्न विशेष लाभदायी ठरते. बुध ग्रह संवाद, शिक्षण, बुद्धिमत्ता, व्यापार, स्मरणशक्ती आणि विवेकबुद्धी नियंत्रित करतो.

हे रत्न हजारो वर्षांपासून ज्ञान, संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्ता यासाठी घातले जाते.

पन्न्याचे गुणधर्म

रंग – फिकट हिरवा ते गडद हिरवा

कठोरता – मोह्स स्केलवर 7.5 ते 8

पारदर्शकता – पूर्ण पारदर्शक ते अर्धपारदर्शक

किंमत – रंग, शुद्धता आणि आकारानुसार बदलते

प्रसिद्ध खाणी – कोलंबिया, ब्राझील, झांबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत

पन्ना रत्नाचे फायदे

 मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते

 स्मरणशक्ती सुधारते

 व्यावसायिक आणि शैक्षणिक यशासाठी मदत होते

आर्थिक प्रगती आणि व्यापारातील लाभ मिळतो

 वाणीला प्रभावीपणा आणि गोडवा येतो

 ताणतणाव आणि नकारात्मकता कमी होते

ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी Rummy नाही, हे ५ मार्ग आहेत योग्य 

हनी ट्रॅप म्हणजे काय? फसवणुकीपासून वाचण्यासाठी मार्ग

 पन्ना रत्न कसे घालावे?

पन्ना सोने किंवा चांदीच्या अंगठीत बसवून घालणे उत्तम.

अंगठी बुधवार या दिवशी सकाळी घालावी.

हे रत्न उजव्या हाताच्या कनिष्ठिका (लहान बोट) मध्ये परिधान करावे.

रत्न शुद्ध करण्यासाठी प्रथम कच्च्या दुधात व गंगाजलात धुवावे.

पन्ना रत्न ओळखण्याची पद्धत

खरे पन्ना रत्न ओळखण्यासाठी:

त्यात थोडे इनक्लूजन (आतील रेघा) असतात, अगदी पारदर्शक नसते.

खूपच स्वच्छ, बुडबुडे नसलेले किंवा अत्यंत स्वस्त पन्ना बनावट (सिंथेटिक) असू शकते.

नेहमी प्रमाणित (Lab Certified) रत्नच खरेदी करावे.

काळजी घेण्याचे नियम

पन्ना खूप कठीण नसते, त्यामुळे धक्का बसल्यास फुटू शकते.

गरम पाणी, अॅसिड किंवा साबणाने धुणे टाळावे.

स्वच्छतेसाठी फक्त कोमट पाण्यात हलकेच धुऊन मऊ कपड्याने पुसावे.

पन्ना हे केवळ एक सुंदर रत्न नाही तर बुध ग्रहाशी संबंधित अध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व असलेले शक्तिशाली रत्न आहे. हे शिक्षण, व्यवसाय, संवाद, बुद्धिमत्ता आणि आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जाते. मात्र ते नेहमी प्रमाणित आणि मूळ रत्नच योग्य पद्धतीने घालावे.

Gemstone cha yogya vapar
Gemstone Benefit 


SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

माझं घर
https://www.majeghar.com/