![]() |
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - PMJAY |
आजच्या काळात दर्जेदार आरोग्य सेवा मिळवणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महागडे झाले आहे. आज स्वतःला किंवा घरातील सदस्याला जर काही मोठा आजार झाला, तर कित्येक वेळा आपल्या बचतीतील रक्कम शून्यावर येते किंवा लाखोंचं कर्ज आपल्यावर चढते. दवाखाना हा असा खर्चिक प्रश्न आहे की त्यात कोणीही तडजोड करू शकत नाही किंवा टाळाटाळ करू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत वैद्यकीय विमा असणे खूप आवश्यक आहे. आणि ज्यांच्याकडे तो नाही, त्यांनी सरकारी योजनांचा नक्कीच लाभ घ्यायला हवा, कारण सरकारने या योजना आपल्या सारख्या सामान्य जनतेसाठीच बनवल्या आहेत.
परंतु, सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात आणि ती गोळा करण्यासाठी वेळ जाऊ शकतो. त्यामुळे अनेक लोक या योजनेचा लाभ घेण्यास टाळाटाळ करतात आणि शेवटी आपल्यालाच आर्थिक फटका बसतो. मात्र, येथे मी काही महत्वाच्या सरकारी आरोग्य योजनांबद्दल माहिती देत आहे, ज्याचा लाभ तुम्ही नक्कीच घेऊ शकता.
आयुष्मान भारत योजना (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - PMJAY) हि योजना खरंच सर्व सामान्य जनतेसाठी संजीवनीच आहे कारण या योजनेमध्ये ५लाखांपर्यत तुमचा कॅश लेस उपचार होऊ शकतो. आता अनेक जण म्हणतील कि हे फक्त सांगण्यासाठी असतं वास्तविक हा लाभ भेटत नाही . परंतु असा नाही आता काही दिवसापूर्वी या योजनेचा लाभ माझ्या घरात घेतला आहे . थोडक्यात सांगतो माझ्या भाचीला जन्मतःच ह्रयद्याला एक छोटं होल होत डॉक्टरांनी सांगितलं कि एक वर्षांनी तिचं ऑपरेशन करावं लागेल ज्याचा अंदाजे खर्च ३लाख रुपये इतका आहे. जुन महिन्यात तीच ऑपरेशन करायचं होत त्याआधीच आयुष्मान कार्ड काढुन घेतले प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये तीच ऑपरेशन साठी ऍडमिशन केलं त्यावेळी आयुष्मान योजनेअंतर्गत एकदम मोफत असे हे ३लाखाचे ऑपरेशन झाले. मेडिकल चा सुद्धा खर्च नाही कि तिथे जेवणाचा राहण्याचा खर्च करायची गरज लागली नाही. खूप साफ आणि स्टाफ सुद्धा खुप हुशार प्रेमळ होता . सांगण्याचा तात्पर्य कि अनेक लोकांना वाटते कि सरकारी योजनेचा लाभ जेथे भेटतो तेथे सुखसोयी व्यवस्थित नसतात पण असे काही नाही आम्ही हे अनुभवले आहे . आज तीच ऑपरेशन साठी आमच्यकडे ३लाख नव्हते हि योजना नसती तरी ऑपरेशन हे केलेच असते पण शेवटी कर्ज घायवेचं लागले असते . आमच्यासाठी तर हि योजना संजीवनी ठरली तुम्हला हि गरज असेल तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करू शकता.
मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana - PMMVY) ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांसाठी भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेअंतर्गत पहिल्या बाळंतपणासाठी गर्भवती महिलेला एकूण ₹5,000 ची आर्थिक मदत दिली जाते, जी जी तीन टप्प्यांमध्ये (इन्स्टॉलमेंट्स) दिली जाते.
हा लाभ कोणाला मिळू शकतो
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिला
- पहिलं अपत्य असणाऱ्या महिला
- गर्भवती असताना व बाळंतपणानंतर आरोग्य तपासणी केलेल्या महिला
- पहिली किश्त ₹1,000 – गर्भधारणा नोंदणीवर
- दुसरी किश्त ₹2,000 – किमान एका अँटेनेटल चेकअपनंतर
- तिसरी किश्त ₹2,000 – बाळंतपणानंतर लसीकरण पूर्ण झाल्यावर
- गरीब, economically weaker वर्गातील नागरिकांना उच्च दर्जाचे आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देणे.
- जीवनदायिनी शस्त्रक्रिया, उपचार आणि हॉस्पिटलायझेशनसाठी आर्थिक संरक्षण मिळवून देणे.
- ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवणे व आरोग्याच्या असमानतेत कपात करणे.
- ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांसाठी आहे.
- अंत्योदय अन्न योजना (AAY) किंवा Below Poverty Line (BPL) कार्डधारक
- सन्माननीय शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब
- म्हाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
- शासकीय आदेशांनुसार SECC-2011 डेटाच्या आधारे पात्र असलेली कुटुंबे
- मोफत उपचार व शस्त्रक्रिया – 1000 हून अधिक प्रकारचे उपचार मोफत.
- ५००००० रुपयांपर्यंतचा विमा कवच प्रति कुटुंब प्रतिवर्ष.
- महाराष्ट्रातील शासकीय व मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय.
- Cashless सुविधा – Beneficiary ला काहीही पैसे भरावे लागत नाहीत.
- बायोमेट्रिक ओळख पद्धत वापरून रुग्णाचे तपशील आणि क्लेम प्रक्रिया सुलभ केली जाते.
- हृदय विकार शस्त्रक्रिया (Cardiac surgeries)
- कर्करोग उपचार (Cancer Treatment)
- मूत्रपिंड (Kidney), यकृत (Liver) व मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया
- अपघाती दुखापत उपचार
- प्रसूती संबंधित सेवा
- नेत्र व ENT सर्जरी
- ऑर्थोपेडिक सर्जरी
- बर्न आणि रीकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी
- Dialysis सेवा
महात्मा फुले जन आरोग्य योजना ही गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक जीवनदायी योजना आहे. उच्च प्रतीच्या आरोग्यसेवा, तीही मोफत, गरिबांना मिळणे हीच योजनेची खरी ताकद आहे.
हे सुध्दा वाचाच
शिष्यवृत्ती परीक्षा : गरज, महत्त्व आणि फायदे – एक सविस्तर मार्गदर्शक
"मध्यमवर्गीय कुटुंब आणि कर्जाचा विळखा – एक सत्य अनुभव"
![]() |
2025 sarkari yojna |
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा