![]() |
हनी ट्रॅप फसवणूक दाखवणारी सायबर क्राईम प्रतिमा |
आजच्या इंटरनेटच्या युगात "हनी ट्रॅप" पासून सावध राहा!
आज इंटरनेटचा उपयोग जितका फायदेशीर आहे, तितकाच तो धोका आणि फसवणूक करण्याचं माध्यमही ठरत आहे. विशेषतः जेव्हापासून जिओसारख्या कंपन्यांनी २ GB डेटा मोफत देण्यास सुरुवात केली, तेव्हापासून लाखो लोक तासन्तास ऑनलाईन राहू लागले आहेत.
अशा वेळेस अनेक जण गेम्स, सोशल मिडिया, अनोळखी चॅट्स किंवा वेगवेगळ्या लिंकच्या आहारी जातात आणि आर्थिक नुकसान करून घेतात.
याचाच एक प्रकार म्हणजे — हनी ट्रॅप.
आज अनेक तरुण-तरुणी, विवाहित व्यक्ती आणि अगदी उच्च शिक्षित लोकही या सापळ्यात अडकत आहेत.
चला तर मग जाणून घेऊया:
हनी ट्रॅप म्हणजे काय?
-
हे कसे चालते?
-
लोक या सापळ्यात कसे अडकतात?
-
आणि अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करता येईल?
![]() |
सायबर फ्रॉड टाळण्यासाठी जनजागृती करणारी इमेज |
हि फसवणूक अशा प्रकरे केली जाते कि कितीही हुशार किंवा कितीही श्रीमंत व्यक्ती याला पकडू शकत नाही. जेव्हा तुम्ही हे अँ प वापरत असाल तेव्हा तुम्ही चुकीचं काय करताय हे तुम्हाला समजणारच नाही सर्वकाही खरंच चालय असेच तुम्हाला भासेल .
फसवणूक करणारे व्यक्ती सोशल मिडिया Facebook, Instagram, WhatsApp वर सुंदर मुलगा/मुलीचे बनावट प्रोफाईल तयार करतात.तुम्हला फ्रेड रिकवेस्ट पटवतात आणि तुम्ही त्या सुदंर मुलीची प्रोफाईल पाहून लगेचच रिकवेस्ट एक्सेप्ट करता. जशी तुम्ही रिकवेस्ट एक्सेप्ट करता त्याची दुसरी स्टेप तयार असते हळूहळू ते गोड बोलून मैत्री वाढवतात. प्रेमाचा बहाणा करतात. काही वेळात प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओ मागतात किंवा पाठवतात.
एकदा का त्या व्यक्तीने असे काही फोटो/व्हिडीओ शेअर केले, किंवा तुम्हला ते व्हिडिओ कॉल करून व्हिडीओ रेकार्डिंग करून ते ब्लॅकमेलिंग सुरू करतात आणि मग हे व्हिडिओ व्हायरल करू”, “घरच्यांना सांगू”, तुमच्या मित्रांना पाठवू “पोलिसांकडे देऊ” असे सांगून भीती निर्माण करतात . अश्या परिस्थितीत ते पैशाची मागणी करतात आणि हजारो लाखो रुपये ऑनलाईन लुटतात.
हनी ट्रॅप चे संकेत ओळखा:
अति सुंदर प्रोफाईल फोटो - फेसबुक इंस्टाग्राम किंवा इतर साईट वरती अशा अनोळखी व्यक्ती सुंदर मुलीचे प्रोफाईल बनवतात.
अज्ञात व्यक्तीचा अचानक मेसेज - अनोळखी व्यक्तीचा फोन किंवा मेसेज येतो जसे कि पोलीस स्टेशन मधून बोलतोय कोर्ट मधून बोलतोय . पार्सल आहे असे फोन टाळा
लगेच जवळीक साधण्याचा प्रयत्न
-
बोलण्यात खूप गोडवा
-
लवकरच व्हिडीओ कॉल, फोटो किंवा प्रायव्हेट गोष्टी मागणे
-
गुप्ततेचे वचन घेणे
हनी ट्रॅप पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?
अनोळखी व्यक्तीशी संवाद टाळा
सोशल मिडियावर कोणाशीही सहज विश्वास ठेऊ नका अनोळखी लोकांची फ्रेंड रिकव्हेस्ट एक्स्पेंट करू नका किंवा तुम्ही रिकव्हेस्ट पाठवू नका
फोटो/व्हिडीओ शेअर करू नका
कधीही कोणासोबत तुमचे वैयक्तिक किंवा अर्धनग्न फोटो व्हिडीओ शेअर करू नका, तुमच्या प्रोफायल वर ठेवू नका
प्रायव्हसी सेटिंग्ज नीट ठेवा
तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स प्रायव्हेट ठेवा.
फसवणुकीची शंका आल्यास त्वरित ब्लॉक करा
आणि सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवा:
👉 https://cybercrime.gov.in/
आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट हे शस्त्रही आहे आणि शत्रूही. योग्य वापर केल्यास आयुष्य सुकर होतं, पण चुकीचा वापर आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच, सजग राहा, शहाणपणाने वागा, आणि हनी ट्रॅपसारख्या फसवणुकीपासून स्वतःचा बुद्धीने बचाव करा.
तुमच्या सोबत असे काही घडले आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा