![]() |
VANTARA JAMNAGAR |
कोल्हापूर मधील नांदणी गावातील हत्तीण म्हणजेच आपली महादेवी किंवा माधुरी. जवळ जवळ ३० वर्षापासुन नांदणी मठात आनंदाने राहत होती . सर्वजण तिला देवीच्या स्थानी मनात होते . छोट्या मुलांसह वृद्धापर्यंत सर्व जन महादेवीचे भक्त होते. परंतु अचानक कोणाची तरी नजर लागावी असे काही महादेवी सोबत झाले. पेटा (People for the Ethical Treatment of Animals) जागतिक पातळीवरील प्राणीहक्क संघटनेणं न्यायालयात अर्ज केला कि नांदणी मठातील हत्तीला आजार जडलेला आहे आणि मठा कडुन तिची योग्य ती काळजी घेतली जात नाही. याच दरम्यान अनेक वेळा या लोकांनी महादेवी ला नेह्ण्याचा प्रयत्न केला परंतु कोल्हापूर मधील लोकांनी त्यांना महादेवीला नेहून दिले नाही . शेवटी पेटा PETA ने न्यायालयांमार्फत कोल्हापूर वाशियांसोबत लढा दिला ज्यात माणुसकी हरली आणि पैसा किवा खोटेपणाचा विजय झाला न्यायालयाने महादेवीला वनतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्रांमध्ये नेण्यास परवानगी दिली. आणि काही तासांतच वनतारांची गाडी आपल्या महादेवीला घेउन कोल्हापूर मधुन निघुन गेली जाते वेळेस तेथील लोकांच्या आणि स्वयं महादेवीच्या डोळ्यात सुद्धा पानी आले होते.
हे सुद्धा महत्वाचे
जंगलातील रशियन महिला: ८ वर्षे गोकर्णच्या गुहेत जगलेली एक रहस्यमय सत्यकथा
ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी Rummy नाही, हे ५ मार्ग आहेत योग्य
महादेवी कोल्हापुर मधुन निघाली आणि गुजरात मधील जामनगर येथील वन्यजीव पुनर्वसन केंद्र म्हणजेच वनतारा मध्ये तिचा प्रवेश झाला. मिंत्रानो आज आपण या वनतारा बद्धल थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (फक्त पैशाने ) अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन या संस्थेच्या वतीने २६ फेब्रुवारी २०२४ साली अंनत अंबानी याच्या नेतृत्वाखाली वनतारा ची स्थापना करण्यात आली. वनतारा ची एकूण जागा ३००० (तीन हजार एकर) पेक्षा जास्त आहे. हे एक आधुनिक प्रकारचे जंगल आहे असे अनंत अंबानींना वाटते . या जंगलामध्ये दुखापत झालेले , शिकारी मध्ये सापडलेले प्राणी आणून त्याच्यावर उपचार केले जातात आणि त्यांना तिथेच वास्तव्यास ठेवले जाते. सध्या वनतारामध्ये २००० पेक्षा जास्त प्राणी आहेत जे देश विदेशातील नष्ट होत चालेल्या जाती मधील आहेत .
![]() |
Mahadevi Hatti Kolhapur |
वनतारा मध्ये असलेले काही विशेष प्राणी
सिहं - गुजरातच्या गीर जंगलाशी संबंधित असलेले आशियायी सिहं येथे पहावयास मिळतात तसेच हत्ती,बिबटे,लोकर असलेले अस्वल , वेगवेगळ्या जातीचे साप या ठिकाणी पहावयास मिळतात.
महादेवी हत्ती आणि कोल्हापुरकर यांच्यात जे नाते होते ते कोणीच समजु शकत नाही. माणसाकडे पैसा असेल तर त्याला कोणीही रोखु शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले . महादेवीला घेउन गेल्यानंतर कोल्हापूर वासियांनी खूप शर्तीचे प्रयत्न केले पण काही लोकांनी यांच्यात सुद्धा राजकारण केले. आज पर्यत न्युज मीडिया कोल्हापुर वासियांचे दुःख दाखवत होते पण अचानक सर्व मीडिया वाले वनतारा मध्ये जाउन तिथले प्राणी प्रेम दाखवु लागले हे एका दिवसांत कसे शक्य झाले. वनतारा मध्ये या मीडिया वाल्यांचे संमेलन भरवले होते का कि सगळे एकाच वेळी रिपोर्ट करण्यासाठी तिथे गेले. सर्व सामान्य नागरिक या मीडिया वर विश्वास ठेऊन मीडिया ने दाखवलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतात . पण हे मीडिया वाले खरंच सत्याच्या बाजुने असतात कि खरेदी केलेले तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट मध्ये सांगा
![]() |
Vantara Madhe Rahanare Prani सरकारी आरोग्य योजना – खरा अनुभव आणि संपूर्ण माहिती (2025) |
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा