![]() |
alt="क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन मुळे आलेली अडचण" |
कर्जाचा विळख्यात – एक मध्यमवर्गीय सत्य अनुभव
कर्ज
गाव सोडून जवळजवळ २० वर्षं झालीत, पण अपेक्षांचं ओझं अजूनही हलकं झालेलं नाही. आणि या अपेक्षा पूर्ण करताना, असं एकही दिवस गेला नाही जो कर्जाशिवाय सरला असेल. जॉब लागल्यापासून गावाकडची परिस्थिती सुधारावी म्हणुन पाहिले कर्ज घेतले, त्यातून बाहेर येई पर्यंत लग्नासाठी पुन्हा कर्ज घेतले. लग्नानंतर फॅमिलीला खुश ठेवण्यासाठी क्रेडिट कार्ड घेतले.
क्रेडिट कार्डमुळे खर्च एवढा झाला की पगारा पेक्षा जास्त क्रेडिट कार्डचं बिल येऊ लागलं. नंतर एका क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी दुसरं क्रेडिट कार्ड घेतलं. असे चार ते पाच क्रेडिट कार्ड झाले. आता सगळ्या क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पुन्हा पर्सनल लोन घेतलं.
जेवढ्या प्रमाणात लोन घेतलं, तेवढा पगार कधीच वाढला नाही. आता हे पर्सनल लोन कमी होत आलं की घर घेण्याचा विचार घरच्यांनी डोक्यात घातला, म्हणजे पुन्हा मोठं लोन. पण पुढे जाण्यासाठी लोन घेण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून पुन्हा २० लाखांचं लोन घेतलं. घर झालं. आता मुले झाली, अजून एक जबाबदारी अंगावर आली. घराच्या लोनमध्ये कधीही हप्ता व्यतिरिक्त एकही रुपया एक्स्ट्रा भरता आला नाही. आजही हप्ते चालूच आहेत.
कर्जाचं चक्र – कधी थांबत नाही
माणसाच्या अपेक्षा कधी पूर्ण होत नाहीत आणि या हप्त्यांमधून कधी बाहेर येत नाही. या अपेक्षा पूर्ण करत मध्यम वर्गातील माणूस या कर्जाच्या विळख्यात सापडतो, हे आपल्याला कधीच कळत नाही. ही कथा माझीच नाही, तर माझ्यासारख्या हजारो मध्यमवर्गीय तरुणांची कहाणी आहे. सत्य कहाणी आहे.
श्रीमंत नाही, गरीब नाही – मध्यमवर्गच अडकतो
गरीब लोक कर्जाच्या विळख्यात सापडत नाहीत कारण त्यांच्या अपेक्षा कमी असतात – मिळेल तेव्हड्यात आनंद. श्रीमंत लोक लोनला घाबरत नाहीत कारण लोन भरायची त्यांची ताकद असते. आणि नाही भरले तरी ते देश सोडून जाऊ शकतात. या लोनच्या विळख्यात अडकतो तो मध्यमवर्गीय व्यक्ती – जो ना श्रीमंत असतो ना गरीब.
स्वतःला विसरून स्पर्धा
आज इतर लोकांसोबत स्पर्धा करताना आपण स्वतःला विसरून जातो. आपली परिस्थिती विसरून जातो. हे सत्य लिहिण्यामागे उद्देश फक्त एकच आहे की, जर कोणी नवीन जॉबला लागले असेल किंवा भविष्यात जॉब करणार असेल, अशा मित्रांनी या कर्जाच्या आणि क्रेडिट कार्ड च्या मोहापासून दूर रहावं. अन्यथा तुमची प्रगती केव्हाच होणार नाही... कारण हप्त्यांच्या ओझ्याखाली तुम्ही दुसरा कोणताही नवीन बिझनेस किंवा पुढे जाण्याचा विचार करू शकत नाही... हिम्मत करू शकत नाही.
तुमचा अनुभव?
जर तुम्ही पण हे अनुभवलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.
वाचायलाच हवा:
![]() |
Ka Gheta Personal Loan |
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा