![]() |
Sarkari Yojna 2025 |
नमस्कार शेतकरी मित्रानो शेती करताना आपल्याला अनेक संकटाना तोड द्यावे लागते, जास्त पाउस आला तरी नुकसान कमी आला तरी नुकसान .. जेव्हा पिकाला भाव असतो तेव्हा आपल्याकडे पीक नसते आणि जेव्हा भाव नसतो तेव्हा एव्हडा माल असतो कि टाकून द्यायची वेळ येते. म्हणजेच जास्तीत जास्त वेळेस नुकसान होण्याचे अटळ असते . अशा वेळेस काही शेतकरी आत्महत्या करतात किंवा काही आपली शेती विकायला काढतात परंतु या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी आणि पुढील पिढीसाठी योग्य नाहीत .. या मधून मार्ग काढण्यासाठी आपल्याला शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे . मी यासाठी इथे काही योजना देत आहे तसेच तुम्हाला प्रोजेक्ट साठी प्रोजेक्ट रिपोर्ट हवा असेल तर कमेंट करा मी तुम्हाला त्याचा फॉरमॅट देईन . आणि हे लक्षात घ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते सहजासहजी काही मिळत नाही . आपल्या मराठी लोकांमध्ये अनेक लोक तुम्हला कधीच योजनेचा फायदा घेतलेला सांगणार नाहीत पण योजना न घ्यावी म्हणून असंख्य चुकीचे सल्ले मात्र देतील त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला एका दिवसात यश मिळणार नाही पण एकदिवस नक्की मिळेल हे लक्षात ठेवा . पाहुयात योजनेबद्धल.
राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission - NLM)
कुक्कुटपालनासाठी जाती सुधारणा योजना
-
सहाय्य:
-
किमान 1000 पेरेट बर्ड्ससह ब्रिडिंग युनिट किंवा हॅचरी स्थापन करण्यासाठी
-
५०% भांडवली अनुदान (सबसिडी) – जास्तीत जास्त ₹२५ लाख
-
-
कोण अर्ज करू शकतो?
-
वैयक्तिक शेतकरी, बचत गट (SHG), कंपनी, सहकारी संस्था, FPO
-
कुक्कुट विकास योजना (जिल्हा परिषद मार्फत)
योजनेची रचना:
-
२५ मादी व ३ नर पक्षी असा एक गट दिला जातो
-
गटाचे एकूण मूल्य – ₹१०,८४०
-
५०% अनुदान (₹५,४२० पर्यंत)
-
-
कोण अर्ज करू शकतो?
-
महिला बचत गट, मागासवर्गीय, स्थानिक रहिवासी
-
-
अर्ज साठी संपर्क:
👉 आपल्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय किंवा जिल्हा परिषदमध्ये संपर्क साधा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा