 |
| RR rate unchanged in pune |
घर खरेदी करण्यासाठी हि योग्य संधी आहे कारण ,महाराष्ट्र सरकारने या वर्षी रेडी रेकनरचे दर वाढवले नाहीत . त्याच प्रमाणे स्टम्प ड्युटी, रजिस्टरेशन ,जी एस टी या मध्ये सुद्धा कोणतेच बदल केले नाहीत , त्याच बरोबर अक्षय तृतीय या मुहूर्तावर फ्लॅट बुकींग साठी अनेक बिल्डर्स वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत , त्यामुळे घर घेण्यासाठी अनुकूल असे वातावरण आहे . तुम्ही हि स्वप्नातील घर घेण्यासाठी पुण्यात घर शोधत असाल तर आम्हाला संर्पक करा
महाराष्ट्र सरकारने 2026-27 आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर (Ready Reckoner) दर वाढवले नाहीत, हा निर्णय घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात मालमत्तेचे मार्केट रेट वाढत असताना, सरकारी दर स्थिर राहणे म्हणजेच खरेदीदारांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
रेडी रेकनर रेट म्हणजे काय?
रेडी रेकनर रेट (RR Rate) म्हणजे सरकारने ठरवलेली एखाद्या भागातील मालमत्तेची किमान किंमत.
सरळ भाषेत सांगायचं झालं तर:
👉 कोणतीही प्रॉपर्टी रेडी रेकनर रेट पेक्षा कमी किमतीत रजिस्टर करता येत नाही.
रेडी रेकनर रेट हा प्रत्येक भागात वेगळा असतो जी ठिकाणे प्राईम आहेत अश्या ठिकाणी रेडी रेकनर रेट हा जास्त असतो पुण्यामध्ये बाणेर औध यासारख्या ठिकाणी रेडी रेकनर रेट जास्त आहेत , आणि उंद्री वाघोली या लोकेशनला अजून डेव्हलमेंट चालू आहे त्यामुळे या ठिकाणी रेट कमी आहेत
 |
| RR rate Undri Pune PMC |
रेडी रेकनर रेट कोण ठरवतो?
रेडी रेकनर रेट हा राज्य सरकार ठरवते.
महाराष्ट्रा मध्ये हे काम करण्याचा अधिकार महसूल विभाग (Revenue Department) आणि नोंदणी व मुद्रांक विभाग (IGR – Inspector General of Registration)
यांना आहेत , ज्यावेळी एखाद्या विभागाचा रेडी रेकनर रेट निश्चित करायचा असतो तेव्हा
काही महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात:
लोकेशन (Location)
इन्फ्रास्ट्रक्चर (रस्ते, मेट्रो, स्कूल, हॉस्पिटल)
मागणी आणि पुरवठा (Demand-Supply)
आसपासचे मार्केट रेट
सरकार दरवर्षी (1 एप्रिलपासून) नवीन रेडी रेकनर रेट जाहीर करते.
फ्लॅटच्या किमतीवर रेडी रेकनर रेटचा परिणाम
रेडी रेकनर मुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे फ्लॅट च्या किमतींवर परिणाम दिसून येतो. जेव्हा रेडी रेकनर रेट वाढतात तेव्हा स्टँम्प ड्युटी जी एसटी यासारखे सरकारी टँक्स वाढतात कारण रेडी रेकनर रेट च्या खाली कोणताही डेव्हलपर फ्लॅट चे खरेदीखत करू शकत नाही त्यामुळे ग्राहकाला स्टॅम्प ड्युटी हि रेडी रेकनर रेट वरच द्यावी लागते
रेडी रेकनर रेट निश्चित असल्यामुळे ब्लॅक मनी घेणे खुप कमी झाले आहे ,
या वर्षी पुणे मध्ये महाराष्ट्र सरकारने रेडी रेकनर रेट वाढवले नसल्यामुळे पुण्यातील बांधकाम व्यवसायीकांनी सुद्धा आपले रेट वाढवले नाहीत त्यामुळे तुम्ही आता तुमचं फ्लॅट घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता
भविष्यात काय बदल होऊ शकतात?
पुण्यात लवकरच Micro-Zoning सिस्टम लागू होऊ शकते.
यामुळे:
-
प्रत्येक भागासाठी अधिक अचूक दर
-
प्राईम आणि लोअर एरिया वेगळे
-
अधिक वास्तववादी किंमती
 |
| Ready reconer rate Unchanged in pune |
Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा