खरी मैत्री म्हणजे काय? – दोस्तीचे खरे अर्थ आणि महत्व

MAJE_GHAR

खरी मैत्री म्हणजे काय? – दोस्तीचे खरे अर्थ आणि महत्व

 नमस्कार  मित्रांनो ,

आज या ठिकाणी मी माझा  पहिला ब्लॉग लिहीत आहे ,ब्लॉग लिहण्याचा विचार खूप आधीपासूनच होता पण लिहण्यासारखा विषय भेटत नव्हता.पण काल रात्री अचानक मला एक विषय भेटला, आणी त्याच विषयावर  आज मी लिहणार आहे .........
हा  विषय कोणत्याही राजकारणावरती ,समाजकारणावरती,किंवा कोणत्याही महान व्यक्तीविषयी नाही तर.....  
हा विषय आहे आपल्यातल्याच एका  गावाचा आणि गावासाठी काम करणाऱ्या एका ग्रुप चा
नाव आहे -दोस्ती ग्रुप डिस्कळ  

आज गावोगावी आपल्याला अनेक मंडळे ,ग्रुप  पाहिला मिळतात   जे  काही सणापुरतेच उदयास येतात आणि लोपही लगेच पावतात जसे कि ,गणेशउत्सव शिवजयंती ,किंवा एखाद्या  महान व्यक्तीची जयंती फक्त याच वेळेस एकत्र यायचं डी .जे . लावायचा थोडं अंग वाकड तिकडं करून नाचायचं,काही महाभाग तर  मस्त दारू पिऊन दंगा सुध्दा करतात.  यांच्यामध्येच झालं यांचं सिलेब्रेशन ,दुसऱ्या दिवशी ना मंडळ दिसतं ना या मंडळातील सदस्य ,परंतु यांच्या बरोबर विरुद्ध आहे डिस्कळ गावामधील दोस्ती ग्रुप, या ग्रुप च ब्रीद वाक्य आहे - "नातं मैत्रीचं आपुलकीचं अन सामाजिक बांधिलकीचं "

आपल्या ब्रीद वाक्याप्रमाणेच या ग्रुप चं काम आहे ,आणी ब्रीद वाक्यतील एकानं एक वाक्याची पुर्तता या ग्रुप ने केलेली आहे,आणी अजुन करत आहे. 

इतर ग्रुप प्रमाणे  दोस्ती ग्रुप मध्ये सुध्दा गणेशउत्सव, शिवजयंती किंवा इतर सण साजरे केले जातात .पण तेही खूप वेगळ्या प्रकारे ,जसे गणेशउत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारे डी . जे . किंवा बॅन्ड वाजवला जात नाही. या  वेळेस एक सुंदर गणेशांची मुर्ति पारंपारिक पद्धतीने पालखीमधून पूर्ण गावामधून मिरवणूक काढून त्यांची स्थापना केली जाते. यानंतर  अन्नदान केले जाते,तसेच सर्वाना वृक्ष देवून वृक्षारोपण केले जाते . अश्या प्रकारे आनंदात गणेशउत्सव साजरा केला जातो .

याचं पद्धतीने इतर ही सण वेग वेगळ्या प्रकारे साजरे केले जातात. 





















प्रत्येक वर्षी गावात दोस्ती ग्रुप च्यावतीने रक्तदान शिबीर राबवले जाते आणि याला भरघोस प्रतिसाद सुद्धा मिळतो .

dosti group blud donation
blood donation 

dosti group sociel activity
blood donation 
dosti gorup kadun sociel activity
dosti gorup kadun sociel activity 

दोस्ती  ग्रुप च्या वतीने प्रत्येक वर्षी गावातील शाळेमध्ये गरीब व हुशार मुला मुलींना प्रोसाहन मिळण्यासाठी मोफत वह्या पुस्तके वाटप केले जातात .याचा फायदा अनेक गरीब कुटूंबातील मुलांना झाला आहे .

दोस्ती ग्रुप ने अनेक सामाजिक कार्यामध्ये आपला हातभार लावला आहेच पण सध्या गावावर आलेलं दुष्काळाचं संकट नाहीस करण्यासाठी दोस्ती ग्रुप च अप्रतिम काम गावामध्ये चालू आहे .

या वर्षी गावामध्ये दुष्काळाचं प्रचंड मोठं संकट उभे आहे .गावामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे .या दुष्काळाची कायमची अडचण दूर करण्यासाठी दोस्ती ग्रुप च्या सहभागाने  "पाणी फाऊन्डेशन" ची खूप मोठी चळवळ गावामध्ये राबवली जात आहे . सकाळी ७वाजल्यापासून रात्री १२पर्यत गावातील लोक स्वइच्छेने श्रमदान करतात यांच्यामध्ये स्त्री ,पुरुष, वृद्ध, लहान मुले, सर्व पक्ष्याचे नेते कार्यकर्ते सर्वजण एकत्र येऊन गावासाठी काम करत आहेत.



gavatil lokana pani che mhatav sagtana
gavatil lokana pani che mhatav sagtana



samjik badhilki dosti goup
dosti group kadun social activity 



dosti group ne hati ghetle kam
gavtil lokana mhent che mhatv 

दोस्ती ग्रुप ने केलेल्या कामाबध्दल सांगण्यासारखं आणि लिहिण्यासारखं खूप काही आहे .या ठिकाणी मी त्यांनी केलेल्या कामाची थोडक्यात मांडणी केलेली आहे . आज शहरात खुप मोठे लोक आहेत जे ट्रस्ट च्या माध्यमातून गरीब लोकांना मदत करतात .परंतु  गावाकडे आर्थिक मदत करण्यासाठी ना कोणती ट्रस्ट आहे ना शहरासारखी मोठी माणसे .
दोस्ती ग्रुप मधील सदस्य हे आर्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत नाहीत ,स्वतः नॊकरी व्यवसाय करून मिळवलेल्या पैशातून काही रक्कम ही समाजकार्यासाठी दिली जाते .आणि हे करण्यासाठी खूप मोठं मन लागत .

दोस्ती ग्रुप मधील सदस्य आर्थिक दृष्टया खूप श्रीमंत नसले तरी त्यांच्या मनाची श्रीमंती एवढी आहे की ज्याचे मोजमाप कशातही करता येणार नाही .

दोस्ती ग्रुप च्या सदस्यांना एकत्र आणण्याचे आणि त्यांना एकत्र ठेवण्याचे कार्य दोस्ती ग्रुप चे अध्यक्ष मा.मयुर मधुकर कर्णे यांनी खूप उत्कृष्ट रित्या केले आहे .त्यांनी चालू केलेल्या समाजकार्यात काही लोकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याकडे लक्ष न देता त्यांनी व ग्रुप ने त्यांचे`काम अखंड रित्या चालू ठेवले आहे . 


दोस्ती ग्रुप डिस्कळ आपण जे गावासाठी आज काम करीत आहात त्यासाठी आपणांस मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 

dosti mhanje sukh dukhacha reletion
dosti karayche naste nibhvayche aste 
symbol of dosti group
क्रमशः

"स्मार्ट टेक्नॉलॉजी: आपल्या दैनंदिन जीवनातले बदल"
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

माझं घर