BUSINESS PLAN

MAJE_GHAR

BUSINESS PLAN

 



नमस्कार मित्रांनो ,

आजचा विषय आहे -बिझनेस प्लॅन  



याच कारण आज आपल्या सभवताली  असे अनेक जण पाहिला मिळतातं कि ,ते बीजनेस चालू करतात आणि २ ते ३ महिन्यात बंद हि होतात. याचा कारण काय ??????
याच एकच कारण कि योग्य प्रकारे बिझनेस प्लॅन करत नाहीत.


मित्रांनो फक्त बेजनेस करायचा म्हणून होत नसतो त्यासाठी खूप गोष्ठीचा आभ्यास करणे गरजेचे आहे. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे ,कि प्लॅन नसताना जर आपण एखादी गोष्ट करायला गेलो तर त्यामध्ये नक्कीच आपण फेल होणार,या फेल होण्याचं एक खरा किस्सा या ठिकाणी मी सांगणार आहे.

मी  एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये जॉब करतोय,माझ्या सॊबत माझा कलिग विवेक  हा सिनियर सेल्स ऑफिसर म्हणून माझ्या सोबत काम करतोय,महिन्याला ३५ ते ४० हजार रुपये पगार सर्व काही व्यवस्थित चालू  होतं ,पण  साहेबांना काही दिवसांपासून यु ट्यूब वरती व्हिडिओ बघण्याचा नाद लागला होता. ऑफिस मध्ये हि तो तेच करायचा सकाळी आल्यापासून संध्याकाळी घरी जाई पर्यंत तो व्हिडिओ च बघत असायचा,
कळत नव्हतं कि याला मध्येच कुठून हा नाद लागला,ना राहून मी त्याला विचारल कि रोज रोज काय पाहत असतो यु ट्यूब वरती ,साहेब बोलले की ,जॉब करायचा कंटाळा आलाय आता काहीतरी बिजनेस करावा म्हणतोय ,आणि कोणता बिजनेस करायचा हे यु ट्यूब वरती बघतोय.



मला कळत नव्हतं की यु ट्यूब वरून याला कस कळणार की कोणता बिजनेस करावा,यु ट्यूब ला काय माहीत असणार यांच्यात काय गुण आहेत असो ....... 
काही दिवसांनी आम्ही ऑफिस च्या बाहेर संध्याकाळी भेटलो याच विषयावरती बोलण्यासाठी...... आता याचा निर्णय झाला होता की जॉब सोडायचा आणि एक दुकान रेन्ट ने घेयून डेअरी प्रॊडक्ट विक्री साठी ठेवायचं  

त्या दिवशी आमचं बोलणं चालू होत,मी त्याला बोलो की ,विवेक तुला बेजनेस बद्धल काही अनुभव नाही थोड्या दिवस याच फिल्ड मध्ये काम कर ज्याचा बेजनेस सुरु करायचा आहे त्याचा मार्केट सर्वे कर प्रॉफिट मार्जिन चेक कर आणि मग काही दिवसानंतर बेजनेस चालू कर पण नाही साहबांनी सोशल मीडियावरती एव्हडे मोटिवेशनल विडिओ,बेजनेस विडिओ पाहिले कि त्याला वाटले आपण लगेच अंबानी होणार.   



साहेब अंबानी  झालेले स्वप्न रंगवू लागले,तो फक्त पॉझेटेव विचार करत होता हि गोष्ट चांगली होती,पण नेहमी सर्वच गोष्टी पॉझेटेव होतील असं नाहीना,नाण्याला दोन बाजू असतात तसं दोन्ही बाजूनी विचार करायला हवा होता . गप्पा मारतं असताना घड्याळात  २ वाजले आणि आमची रात्र संपली ......




दुसऱ्या दिवशी विवेक नेहमी प्रमाणे ऑफीस ला आला,आणि कॉम्पुटर वरती मेल टाईप करू लागला,मी कामात असल्यामुळे मला काही समजल नाही कि तो काय करतोय ते,मेल टाईप करून झाल्यावर त्याने मला बोलावले आणि मेल चेक करायला सांगेतला,मी तो मेल पहिला,तो मेल होता रिझायन लेटर चा ,मी त्याला बोलो पूर्ण विचार  करून करतोयस ना आज मार्केट मध्ये मुलांना जॉब भेटत नाहीत तु हातातली ३५ हजाराची नोकरी सोडतोय.पण त्याने कोणताच विचार न करता तो मेल पुढे पाठवला आणि एक महिन्याचा नोटीस पिरेड देऊन तो कंपनी सोडून  गेला .


जॉब सोडल्यानंतर यांची दुकान शोधाशोध सुरु झाली,खूप ठिकाणी दुकान शोधल्यानंतर एक दुकान त्याला त्याच्या मनासारखा भेटलं पण दुकान रेंट ने घेण्यासाठी १लाख डेपोसिट आणि २५हजार महिन्याला भाडं होत .

आता याच बजेट तर होतं ३लाखांमध्ये दुकान चालू करायचा,पण डेपोसिट ला १लाख गेले १लाख फर्निचर साठी राहिले फक्त १लाख ,दुकानात माल भरण्यासाठी कमीत कमी २ ते ३लाख लागणार होते आणि बाकीच किरकोळ कामासाठी १लाख तरी लागतील .

विवेक ची घरगुती परिस्थिती एव्हडी पण खास नव्हती, वडील रिटायर्ड जाले होते त्यांना मिळालेल्या पैश्यातून आणि २लाख रुपयाचे बँकेचे कर्ज काढून त्याने हे दुकान चालू केले . 
दुकान चालू तर झाले.आता बेजनेस सेट व्हायला कमीत कमी एक वर्ष द्यायला हवं होतं पण या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली की,पहिल्या दोन महिन्यात गल्ला झाला ५०हजार आता यांच्यामधून   प्रॉफिट १५ हजार आता दुकानाचं रेन्ट द्यायला सुद्धा यांच्याकडे पैसे नव्हते. जॉब सोडल्यामुळे बाकीचे सर्व खर्च अंगावर आले  बँकेचा हप्ता मुलांच्या शिक्षणाचा खर्च & फ्लॅट च भाडं , . हे सर्व काही त्याला म्यॅनेज होत नव्हतं . कसबस दोन महिने त्याने दुकान चालवले आणि तिसऱ्या महिन्यातच दुकान बंद केले





शेवटी त्याच्या या विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे आत्ता पर्यंत सेव्हिन्ग केलेले पैसे गेले  ,हातातला ३५ हजार पगार असलेला जॉब गेला आणि वरून डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला ते वेगळाच

मला असा वाटत की ,प्रत्येकाने एकदातरी बिजनेस करायचा प्रयत्न

 नक्कीच करावा पण पूर्ण विचारपूर्वक - त्यासाठी खालील गोष्टीचा

 वापर तुमच्या प्ल्यानींग मध्ये नक्की करा















क्रमशः 


SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

माझं घर
https://www.majeghar.com/